शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बसवर १० गावच्या विद्यार्थ्यांची शाळा अवलंबून; ज्यादा बससाठी विद्यार्थ्यांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:15 IST

बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी समर्थनगर जवळ बस रोखून धरत ठिय्या मांडला.

पाथरी :  पाथरी - सोनपेठ मार्गावरील दहा गावातील विद्यार्थ्यांना सकाळी शहरातील शाळेत जाण्यासाठी केवळ एकच बस उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने एकमेव बस गैरसोयीची होत आहे. या मार्गावर सकाळच्या वेळेत ज्यादा बस सोडावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी समर्थनगर येथे बस रोखून धरत ठिय्या दिला. 

कोविड 19 च्या प्रादुर्भावानंतर बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण घेत घरात मोबाईलला चिटकून बसलेले विद्यार्थी आता शाळेत येऊ लागले आहेत. शाळेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात दाखल होण्याची संख्या मोठी आहे. शाळा नियमित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. पाथरी - सोनपेठ रस्त्यावर आठ ते दहा गावे आहेत. येथील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येण्यासाठी परळी -सिरसाळा - पाथरी ही एकमेव बस आहे. विटा गावापासून विद्यार्थी बसने प्रवास करतात. पुढे येईपर्यंत बस फुल होते. बाभळगाव, लोणी, टाकळगव्हान, समर्थनगर येईपर्यंत तर बसमध्ये उभे राहण्यास सुद्धा जागा राहत नाही. यामुळे या मार्गावर सकाळच्या वेळेत ज्यादा बस सोडावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी वारंवार महामंडळाकडे केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या. मात्र, बसमध्ये जागा नसल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी समर्थनगर जवळ बस रोखून धरत ठिय्या मांडला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रविंद धर्मे यांनी आगर प्रमुखांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, पाथरी आगाराने दुसरी बस पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. गैरसोय दूर झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा धर्मे यांनी दिला आहे.  

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाStudentविद्यार्थीparabhaniपरभणी