जिंतूर तालुक्यात विविध ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:27+5:302021-02-15T04:16:27+5:30
वाळू चोरीचा मार्ग बदलला वाळू माफिया हे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रकद्वारे वाळू मुख्य मार्गावर वाहतूक करण्याऐवजी यासाठी स्वतंत्र मार्ग ...

जिंतूर तालुक्यात विविध ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसा
वाळू चोरीचा मार्ग बदलला
वाळू माफिया हे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रकद्वारे वाळू मुख्य मार्गावर वाहतूक करण्याऐवजी यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. त्या मार्गानेही वाळू इटोली, भोगाव, पोखरणीमार्गे जाऊन पुढे बोरी, रेपा, रिडज या भागात टाकली जाते. वाळू उपसा करणाऱ्या बोटी या रात्रीच्या वेळी नदीत उतरून वाळू उपसा केला जातो. हे करीत असताना ठिकठिकाणी महिन्याने खबरे लावलेले असून अशा खबऱ्यांना ५ ते ७ हजार रुपये महिना दिला जातो. विशेष म्हणजे नवीन रस्त्यावरून वाळू वाहतूक होत असल्याने वाळूचे ट्रक अडविणे प्रशासनास अडचणीचे ठरत आहे.
प्रशासनाची अनोखी कारवाईची शक्कल
एकीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाकडून रात्रीच्या वेळी वाळू उचलण्यास उशीर झाल्यास वाळू माफिया आपल्या माणसांमार्फत प्रशासनालाही माहिती देतात. प्रशासन त्या वाळूचा लिलाव करून अधिकृतरीत्या ती वाळू ज्यांनी काढली आहे त्यांच्या ताब्यात दिली जाते. परिणामी, अधिकृतरीत्या दिवसाढवळ्या चोरटी वाळू वाहतूक करण्यास प्रशासनाच्या वतीने लायसन्स दिले जात असल्याचे दिसत आहे.