शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या शेतकऱ्यांसाठी पोखर्णीत रोखला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST

परभणी : शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागील ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा ...

परभणी : शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागील ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविवण्याऐवजी दडपशाहीच्या मार्गाने आंदोलकांना जेरीस आणणाऱ्या केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी गंगाखेड रोडवरील पोखर्णी फाटा येथे एक तास जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुकारलेल्या या आंदोलनात चारशे ते पाचशे शेतकरी सहभागी झाले होते.

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि केंद्र शासनाच्या निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन पुकारले होते. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावर आडवे बसून शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरल्याने राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे निमंत्रक विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोखर्णी, इंदेवाडी, सुरपिंपरी, पेगरगव्हाण, उमरी, पिंपळगाव, दामपुरी आदी २० ते २५ गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विलास बाबर म्हणाले, मागील ७२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. हे कायदे रद्द करण्याऐवजी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली सीमेवर भिंती उभारणे, रस्त्यावर खंदक खोदणे, खिळे ठोकणे, तारांचे कुंपण घालून शेतकऱ्यांचीच नाकाबंदी करण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत असल्याचे बाबर यांनी सांगितले. या आंदोलनात विलास बाबर यांच्यासह गणेशराव वाघ, नारायण वाघ, नागेश वाघ, नरहरी वाघ, रामभाऊ एडके, दिगंबर गमे, विशाल कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.