आठ हजार ७०० नागरिकांचे अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:21 AM2021-02-25T04:21:46+5:302021-02-25T04:21:46+5:30

जिल्हास्तरावरच रुग्णांवर उपचार परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी तालुक्याच्या ठिकाणी अद्याप एकही रुग्ण उपचार घेत ...

Reports of eight thousand 700 citizens are pending | आठ हजार ७०० नागरिकांचे अहवाल प्रलंबित

आठ हजार ७०० नागरिकांचे अहवाल प्रलंबित

Next

जिल्हास्तरावरच रुग्णांवर उपचार

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी तालुक्याच्या ठिकाणी अद्याप एकही रुग्ण उपचार घेत नाही. मागील वर्षी अनेक रुग्ण कोरोनामुक्त करणाऱ्या सेलू येथील उपजिल्हा रुग्णलायातही रुग्ण उपचारासाठी दाखल नाहीत. त्यामुळे परभणीवगळता तालुक्याच्या सर्वच ठिकाणची रुग्णालये अजूनही कोरोनामुक्त आहेत.

सौर प्रकल्पाचे आज उद्घाटन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नाहेप प्रकल्पांतर्गत २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास कुलगुरु डॉ. अशोक ढवण, आ. डॉ. राहुल पाटील, आ. विनायकराव मेटे, कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. एस.टी. बोरीकर, डॉ. पी.जी. पाटील, लिंबाजीराव भोसले, अजय गव्हाणे, डॉ. अदितीताई सारडा, बालाजी देसाई, शरद हिवाळे, पवित्राबाई सुरवसे यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्याचा पारा ३४ अंशावर

परभणी : जिल्ह्यात तापमान वाढत आहे. बुधवारी कमाल तापमान ३४ अंशावर पोहोचले होते. किमान तापमानही १३.१ अंश नोंद झाले आहे. नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागली असून, वाढत्या तापमानामुळे वातावरणातील उकाडाही वाढला आहे.

जिल्हा स्टेडियमसमोरील पथदिवे बंद

परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियम आणि जलतरणिका संकुल परिसरातील पथदिवे दोन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या भागात अंधार पसरत आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून, रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत या मार्गावर मोठी वाहतूक आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे दोन दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने या भागातील व्यावसायिक आणि वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

Web Title: Reports of eight thousand 700 citizens are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.