शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

एक फोन येतो, सोन्याचे आमिष दिले जाते आणि पुन्हा एकजण लाखो रुपयांना गंडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 15:33 IST

एका फोन कॉलवर विश्वास ठेवून अनेकजण स्वस्तातील सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत आहेत.

सोनपेठः मागील काही दिवसांपासून सोन्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. मंगळवारी ( दि. 16 ) गंगाखेड तालुक्यातील दत्तवाडी येथे गडचिरोली येथील एकास गंडवल्याची घटना घडली आहे. आरोपींनी त्याच्याकडून रोख १ लाख ४० हजार रुपये आणि मोबाईल काढून घेत पलायन केले. एका फोन कॉलवर विश्वास ठेवून अनेकजण स्वस्तातील सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. विशेष म्हणजे अशा घटना मोठ्याप्रमाणावर होत असतानाही अनेकजण यात अलगद अडकत असल्याचे दिसून येत आहे/

याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ नगर गडचिरोली येथील बाबुराव काटवे यांच्या नातेवाईकांना निनावी नंबरवरून पंधरा दिवसांपूर्वी फोन आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, परभणीतून बोलत असून सहा-सात किलो सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यापैकी एक किलो सोने जर तुम्ही विकून दिले तर तुम्हाला पन्नास ग्रॅम सोने देतो. नातेवाईकांनी याची माहिती काटवे यांना दिली. यानंतर काटवे यांनी त्या नंबरवर पुन्हा कॉल केला आणि सोन्याबाबत विचारणा केली. त्याने ३० हजार रुपये तोळा सोने असून माझे एक किलो सोने तुम्ही विकून दिल्यास तुम्हाला पन्नास ग्रॅम सोने देतो असे समोरच्याने सांगितले. खात्री पटल्याने बाबुराव काटवे सोमवारी ( दि. 15 ) सकाळी ७ वाजता एकास सोबत घेऊन चारचाकीने ( MH-33 V4731) परभणीकडे सोन्याचा व्यवहार करण्यासाठी निघाले. मात्र, आरोपींनी त्यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे येण्यास सांगितले. येथून गंगाखेडमधील दत्तवाडी येथे बोलावले.

मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान ते गंगाखेडच्या दत्तवाडी शिवारात पोहचले. त्या ठिकाणी दोन माणसे व दोन महिला उभ्या होत्या.  आरोपींनी काटवे यांना पैसे दाखविण्यास सांगितले. यावर काटवे यांनी आधी सोने पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी एका महिलेने त्यांना सोने दाखवले. ते बनावट असल्याचे काटवे यांनी लागलीच ओळखले आणि व्यवहारास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी काटवे आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकास मारहाण केली आणि गाडीतील १ लाख ४० हजार रुपये व मोबाईल काढून घेतले. यानंतर काटवे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि श्रीनिवास भिकाणे हे करत आहेत.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी