परळी थर्मलच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली; लाखों लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:06 IST2025-12-03T20:05:19+5:302025-12-03T20:06:15+5:30
गोदावरी नदीवरील खडका बंधाऱ्यावरून परळी येथील थर्मल प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जातो.

परळी थर्मलच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली; लाखों लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान!
सोनपेठ (जि. परभणी) : तालुक्यातील आवलगाव शिवारातील व्यंकटी तांड्याजवळ परळी थर्मलला पाणी पुरवठा करणारी महानिर्मिती कंपनीची पाईपलाईन बुधवारी सकाळी ९ वाजता फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने परिसरातील शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गोदावरी नदीवरील खडका बंधाऱ्यावरून परळी येथील थर्मल प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान आवलगाव शिवारातील व्यंकटी तांडा शिवारात ही पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड वेग थेट शेजारील शेतांमध्ये शिरला. १५ ते २० फुट उंच पाण्याचे फवारे उडाले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून माती देखील पाण्यासोबत वाहून गेली. केवळ शेतामध्येच नाही तर व्यंकटी तांड्यावरील घरांमध्येही पाणी घुसल्याने घरातील संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी, रहिवाशांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
तालुक्यातील आवलगाव शिवारात व्यंकटी तांड्याजवळील गोविंद बबनराव फंड यांच्या शेतातील महानिर्मिती कंपनीची पाईपलाईन बुधवारी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून शेतीच तीन डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा बाहेर पडून परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गोदावरी नदी वरील खडका बंधाऱ्यावरून परळी येथील थर्मलला पाण्याचा पुरवठा केला जातो. ही पाईपलाईन खडका येथून आवलगाव मार्गे थर्मल ला जाते. सदरील पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रचंड वेग थेट शेजारील शेतांमध्ये घुसला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील लागवड केलेला कांदा व हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मातीदेखील पाण्यासोबत वाहून गेली आहे. तसेच हे पाणी व्यंकटी तांड्यावरील घरात गेल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.