परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:29 IST2019-02-07T00:28:53+5:302019-02-07T00:29:26+5:30

रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़

Parbhani: Youth's death in train crash | परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़
आदिनाथ रामराव कांबळे (२०, रा़ लहुजीनगर गंगाखेड) असे मयत युवकाचे नाव आहे़ ५ फेब्रुवारी रोजी रात्री आदिनाथ कांबळे हा कामावरून घरी जात होता. जिल्हा बँकेच्या पाठीमागील बाजुने रेल्वे रुळ ओलांडताना त्याला रेल्वेचा धक्का बसला़ यात हा तरुण गंभीर जखमी झाला़ ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तपासणीअंती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ हेमंत मुंडे यांनी त्यास मृत घोषित केले़ लालसेना या संघटनेच्या माध्यमातून आदिनाथ काम करीत होता. त्यांचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नृसिंह स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ आदिनाथच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, ५ विवाहित बहिणी असा परिवार आहे़ पत्रकार अंकुश कांबळे यांचे ते लहान बंधू होत़

Web Title: Parbhani: Youth's death in train crash