शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:34 IST

शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची असून, संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची या योजनेची क्षमता नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यात परभणीकरांना किमान १० दिवसांनाच पाणी मिळते. सद्यस्थितीत पाण्याच्या आवर्तनाचा कालावधी १२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. त्यातही अनेक प्रभागात जलवाहिनी पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना हातपंप किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रहाटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा फायदा उचलत मागील काही दिवसांपासून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एका आॅटोरिक्षात १ हजार आणि २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवून हे विक्रेते शहरात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. अशा विक्रेत्यांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. शहराबाहेर असणाऱ्या खाजगी विहीर किंवा बोअरवरुन पाणी आणून ते शहरवासियांना दिले जात आहे. एक हजार लिटर पाणी २५० रुपयांना आणि २ हजार लिटर ५०० रुपयांना विक्री केले जाते. एक विक्रेता दिवसभरात किमान पाच फेºया करतो. सुमारे १२५० रुपयांचा त्याचा दिवसाचा व्यवसाय होतो. सरासरी १०० विक्रेत्यांची पाण्यातून पाण्यातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल होत आहे.मनपाच्या नळयोजनेतून मिळणारे पाणी १२ दिवसांपर्यंत साठवणे शक्य नसल्याने अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. शिवाय जलवाहिनी नसलेल्या भागात हातपंपांची पाणी पातळी खालावल्याने या भागातूनही विकतच्या पाण्याला मागणी वाढत आहे. मागील आठवड्यात रहाटी येथील विद्युत पंपाचे स्टार्टर खराब झाल्याने काही भागात १४ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे शहरात पाण्याची टंचाई वाढली असून, पाण्यातून आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन टंचाईग्रस्त भागास टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेचे चार टँकर सुरू४शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ४ टँकरच्या साह्याने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. ज्या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे, त्या भागास टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या जलवाहिनी नसलेल्या भागात चार टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. शहरवासियांना नियमित पाणी मिळत नसल्याने जलवाहिनी असलेल्या भागातही टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केवळ जलवाहिनी असलेल्या भागातील परिस्थिती पाहून टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई