शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:40 AM

यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.सोनपेठ तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पन्न होते. त्यामुळे ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात. सोनपेठ तालुका हा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात प्रमुख पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात.तर रब्बी हंगामातील गहू व ज्वारी ही पिके दररोजच्या आहारातील भाकरीसाठी घेतली जातात. या भागातील शेतीवर निर्भर असणारे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करुन उत्पन्न घेतात; परंतु, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तो ही पहिल्या दोन महिन्यातच झाला. रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरणारा परतीचा पाऊस तालुक्यात झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारी व गहू ही पिके शेतकºयांनी घेतलीच नाहीत. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकºयांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली असली तरी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने साठवण स्त्रोतांमध्ये ठणठणात आहे. त्यामुळे पेरलेले उगवेल व उगवलेले जगेल, याची खात्री देता येत नाही.गेल्या वर्षी १७०० ते २ हजार रुपये स्थिरावलेला ज्वारीचा दर गत तीन महिन्यांपासून वाढत आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ते ३५०० रुपयांवर ज्वारीचा भाव गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी निश्चित महाग झाली आहे.जिल्ह्यात २१ टक्के ज्वारीची पेरणीयावर्षी भर पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. त्यातच परतीच्या पावसानेही शेतकºयांना आकाशाकडेच बघण्याची वेळ आणली. दरवर्षी परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई व हरभºयाची पेरणी करतो. मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाण्याअभावी शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५९ हजार ७८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार