परभणी:अपघातात एकासह ३६ शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST2019-03-23T00:20:03+5:302019-03-23T00:20:29+5:30
धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली.

परभणी:अपघातात एकासह ३६ शेळ्या दगावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली.
भोकरदन येथून एम.एच.१८-२५७६ या क्रमांकाचा ट्रक शेळ्या घेऊन परभणी-पूर्णामार्गे नांदेडकडे जात होता. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास कात्नेश्वर शिवारात या ट्रकचे समोरील चाक निखळले. त्यानंतर हा ट्रक कॅनॉलमध्ये जावून उलटला. या अपघातात ट्रकमधील लक्ष्मण सोनाजी गायकवाड (३५ रा. मनापुर ता. भोकरदन) हा जागीच ठार झाला. तसेच ३६ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. ट्रकमधील महमद अशफाक, शेख साबुल, महमद हनिफ, शेख एजाज, महमद अजरोद्दीन हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जमादार विनोद रत्ने, मिर्झा बेग यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शुक्रवारी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी ट्रक चालक सलीम खान युसूफ खान याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.