परभणी : वर्षभरात ५५ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:40 AM2019-03-02T00:40:06+5:302019-03-02T00:40:38+5:30

निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Parbhani: There are 55 thousand voters in the year | परभणी : वर्षभरात ५५ हजार मतदार वाढले

परभणी : वर्षभरात ५५ हजार मतदार वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीेने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात मे २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ५५ हजार ५७९ नवीन मतदार वाढले आहेत. २३ व २४ फेब्रुवारी असे दोन दिवस नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात २०२, परभणी २२३, गंगाखेड २४० आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात २५५ असे ९२० मतदार वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरची संधी म्हणून ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नाव नोंदणी करण्याकरीता २ व ३ मार्च रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक ठिकाणी बीएलओंची उपस्थिती राहणार आहे. या संदर्भात राजकीय पक्षांनाही माहिती देण्यात आली असून इच्छुकांनी आपली नाव नोंदणी संबंधित मतदान केंद्रावर करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत ते केंद्रनिहाय या संदर्भात आढावा घेतील. त्यानंतर केंद्रावर राहिलेल्या त्रुटींची पूर्तता केली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी मतदारांना १९५० या क्रमांकावर फोन करुन आपल्या नावाची खात्री करता येणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ँ३३स्र://६६६.ल्ल५२स्र.्रल्ल/्रल्लीि७.ँ३े’ या संकेतस्थळावरही नाव नोंदणी करणे किंवा मतदार यादीमधील नावाची खात्री करता येणार आहे.
चार विधानसभा मतदारसंघात १३ लाख ७५ हजार मतदार
४जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात छायाचित्रासह १३ लाख ७५ हजार ४७८ मतदारांची सद्यस्थितीत संख्या आहे. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४५ हजार १२७, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८३ हजार ८२७, परभणी विधानसभा मतदारसंघात २ लाख ९९ हजार १८३ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ३४१ मतदारांचा समावेश आहे. या चारही विधानसभा मतदारसंघात १५१ मतदारांनी मतदार ओळखपत्रासाठी त्यांचे छायाचित्र काढलेले नाही. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११० मतदार पाथरी विधानसभा मतदारसंघात आहेत.
कॉंग्रेसच्या आक्षेपावर ८ मार्चपर्यंत उत्तर देणार
४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात ५१ हजार ९६० मतदारांची दुबार नावे आल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या तक्रारीची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याबाबत चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. ८ मार्चपर्यंत कॉंग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या तक्रारी संदर्भातील माहिती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. निवडणूक विभागाने आतापर्यंत २२ हजार दुबार नावे यादीतून वगळली असल्याचे त्यांनी सांगितले.
३ हजार अपंग मतदार
४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात पूर्वी ९४२ अपंग मतदार होते. प्रशासनाच्या जनजागृती मोहिमेनंतर सध्या २ हजार ९५० अपंग मतदारांची संख्या झाली आहे. शिवाय स्त्री-पुरुष प्रमाण प्रति हजार २ ने वाढले असून ते ९२२ वरुन ९२४ झाले आहे. चार मतदारसंघात १५१ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११० मतदार पाथरी मतदारसंघात आहेत.

Web Title: Parbhani: There are 55 thousand voters in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.