परभणी : कारवाईने वाळू वाहतूकदार अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:20 AM2018-02-27T00:20:25+5:302018-02-27T00:22:38+5:30

नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लावल्याने वाळू वाहतुकदार अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात सोमवारी या वाळू वाहतूकदारांनी येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Parbhani: The sand transportman is uncomfortable with the action | परभणी : कारवाईने वाळू वाहतूकदार अस्वस्थ

परभणी : कारवाईने वाळू वाहतूकदार अस्वस्थ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लावल्याने वाळू वाहतुकदार अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात सोमवारी या वाळू वाहतूकदारांनी येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हाभरात अवैध वाळू वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्याची भूमिका अवलंबिली आहे. या माध्यमातून त्यांनी ७७८ वाळूचे साठे २०१७ या आर्थिक वर्षात जप्त केले होते. जप्त केलेल्या वाळूसाठ्यापैकी ३३६ वाळूसाठ्यांचा लिलाव करुन त्याद्वारे ५ कोटी ७२ लाख २० हजार ३३१ रुपयांचा महसूलही वसूल केला आहे. शिवाय अनेक वाहनांना दंडही ठोठावला असून काही वाहनांवर गुन्हेही दाखल केले आहेत. अवैध वाळू वाहतूक व उत्खनन करणाºयांविरुद्ध जिल्हाधिकाºयांकडून ही कारवाई होत असताना त्यांनी त्यांच्या खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांविरुद्धही कठोर भूमिका घेतली आहे. वाळू प्रकरणातच पालमचे तत्कालीन तहसीलदार आर. के. मेडके यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या बदलीची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार मेडके यांची बीड जिल्ह्यात बदलीही झाली. त्यानंतर गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार यांनाही जिल्हाधिकाºयांनी रजेवर पाठविले. त्यानंतर गंगाखेडचा पदभार दिलेले उपजिल्हाधिकारी डॉ. कुंडेटकर यांनाही पी. शिव शंकर यांच्या निर्णयाचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºयांविरुद्धही ताठर भूमिका घेतली आहे. शनिवारी परभणी रोडवर त्यांनी तीन वाहने पकडून त्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. सोनपेठ तालुक्यातील धक्क्यातून संबंधित वाहनांनी सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान वाळू घेतली. त्यांच्याकडे त्यावेळीची नोंद असलेल्या पावत्याही होत्या. ही वाहने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना परभणी रस्त्यावर दैठाना परिसरात दुपारी ५ वाजेच्या दरम्यान आढळून आली. जिल्हाधिकाºयांनी या वाहनांना थांबवून त्यांच्याकडील पावत्यांची तपासणी केली असता पावत्यांवर सकाळी ८.३० वाजता वाळू उचल्याची नोंद होती. सोनपेठहून परभणीला येण्यासाठी लागणारा वेळ व प्रत्यक्षात वाहन पकडलेली वेळ पाहता संबंधित वाहतूकदाराने अधिक वेळ लावल्यावरुन त्यांच्यावर जिल्हाधिकाºयांनी कारवाई केली. त्यातील दोन वाहने परभणीत आणण्यात आली. तर एक वाहन गंगाखेड पोलीस स्टेशनला लावण्यात आले. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, एकाच पावतीवर दिवसभर वाहतूक करण्याचे प्रकार होत आहेत. संबंधित वाळू वाहतूकदाराने वाळू उचलल्यानंतर ज्या ठिकाणी वाळू पोहचवायची आहे, त्या ठिकाणापर्यंतचे अंतर ठराविक कि.मी. प्रमाणे निश्चित असते. परंतु, अधिक वेळ लागत असल्यास निश्चितच चुकीचे आहे व चुकीच्या पद्धतीने वाळू वाहतूक केली जात असेल तर कुणाचीही गय केली जाणार नाही. शनिवारी करण्यात आलेली कारवाई ही योग्यच होती, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
जिल्हाधिकाºयांच्या या कारवाईनंतर वाळू वाहतूकदार चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. सोमवारी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पिनाटे यांनी त्यांच्या भावना जिल्हाधिकाºयांना कळविण्याचे आश्वासन दिले.
वाहतूकदारांनी निवेदनातून मांडल्या समस्या
या संदर्भात सोमवारी वाळू वाहतूकदारांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गौण खनिजाची वाहतूक करणारे आणि या क्षेत्रात काम करणारे कामगार शिक्षित नसल्याने त्यांच्याकडून वारंवार चुका होत आहेत. त्यामुळे या वाहतुकदारांवर कडक धोरण न अवलंबिता प्रशासनाने योग्य मार्ग काढावा, वाळू घाटाकडे जाणारे रस्ते खराब आहेत, त्यामुळे एसएमएस प्रणालीमधील वेळेत वाळू वाहतुकीची गाडी संबंधित ठिकाणी येणे शक्य होत नाही. तेव्हा एसएमएस प्रणालीच्या वेळेत वाढ करावी, शासनाने सुधारित आदेशानुसार आकारलेला दंड कमी करावा, बंधपत्राची जाचक अट रद्द करावी, जिल्हास्तरावर वाळू वाहतुकदार, वाळू व्यवसायिक व प्रशासन यांची समन्वय समिती स्थापन करून किरकोळ समस्या जागेवरच सोडवाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Parbhani: The sand transportman is uncomfortable with the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.