परभणी : होर्डिंग्जच्या विळख्यात रेल्वे स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:06 AM2018-10-08T00:06:19+5:302018-10-08T00:07:25+5:30

येथील रेल्वेस्थानकामध्ये तिन्ही बाजूंनी होर्र्डिंंग्जचा गराडा पडला असून, मोठ्या आकारातील हे होर्डिंग लावल्याने प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे़

Parbhani: Railway Station, known for its hoardings | परभणी : होर्डिंग्जच्या विळख्यात रेल्वे स्थानक

परभणी : होर्डिंग्जच्या विळख्यात रेल्वे स्थानक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकामध्ये तिन्ही बाजूंनी होर्र्डिंंग्जचा गराडा पडला असून, मोठ्या आकारातील हे होर्डिंग लावल्याने प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे़
चार दिवसांपूर्वी पुणे येथे होर्डिंग्ज पडल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील होर्डिग्जचा आढावा घेतला असता शहरातील मुख्य चौक, रस्ते होर्डिग्ज मुक्त झाले असले तरी रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावर मात्र मोठ्या प्रमाणात होर्डिग्ज लावलेले आहेत़ ठराविक उंचीवर आणि मोठ्या आकाराचे हे होर्डिग्ज असून, वादळी वाऱ्याने होर्डिग्ज पडण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते़ परभणी रेल्वेस्थानकात येणाºया आणि जाणाºया दोन्ही मार्गांवर मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत़
विशेष म्हणजे, या होर्र्डिंग्जचा आकार शहरातील सर्वसाधारण होर्डिग्जच्या आकारापेक्षा अधिक आहे़
स्थानकातील तिन्ही बाजुंनी होर्डिग्ज लावले असून, वादळी वाºयाने यातील एखादे होर्डिग्ज पडले तरी प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो़ रेल्वेस्थानकामध्ये लावलेले हे होर्डिग्ज किती उंचीवर असावेत, या होर्डिग्जचा आकार किती असावा, या विषयी कोणतेही नियम नाहीत़ रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने या होर्डिग्जची मजबुती तपासूनच होर्डिग्ज लावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे़
पोलीस चौकीही धोकादायक
रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेली रेल्वे पोलीस चौकीही धोकादायक बनली आहे़ पोलीस चौकी उभारण्यासाठी बांधलेला कठडा निखळला आहे. त्यामुळे वाºयाने अथवा वाहनांचा धक्का लागल्यानंतरही ही पोलीस चौकी कोसळू शकते़ त्यामुळे ही चौकीही धोकादायक बनली असून, रेल्वे प्रशासनाने पोलीस चौकीच्या कठड्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Railway Station, known for its hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.