इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 09:42 AM 2024-10-27T09:42:41+5:30 2024-10-27T09:46:06+5:30
Israel Attack On Iran: मध्य पूर्वेत मागच्या वर्षभरात सुरू असलेल्या तणावादरम्यान, इस्राइलच्या सैन्याने शनिवारी इराणच्या लष्करी तळांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इस्राइलने0 इराणची सामरीकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं नष्ट केली. एवढंच नाही तर या हवाई हल्ल्यांमध्ये इस्राइलने इराणचं मिसाईल प्रॉक्शन युनिट पूर्णपणे नष्ट केलं. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मध्य पूर्वेत मागच्या वर्षभरात सुरू असलेल्या तणावादरम्यान, इस्राइलच्या सैन्याने शनिवारी इराणच्या लष्करी तळांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इस्राइलने0 इराणची सामरीकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं नष्ट केली. एवढंच नाही तर या हवाई हल्ल्यांमध्ये इस्राइलने इराणचं मिसाईल प्रॉक्शन युनिट पूर्णपणे नष्ट केलं. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने समोर आलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळी इराणविरोधात इस्राइलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅममधील एक महत्त्वपूर्ण युनिट नष्ट झालं आहे.
इस्राइलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्राइलने लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी लागणारं सॉलिड फ्लुएल उत्पादन करण्यासाठी लागणारे इराणचे १२ प्लॅनेटरी मिक्सर नष्ट केले. हे मिक्सर इराणच्या शस्त्रागाराचा महत्त्वाचा भाग होते.
हे मिक्सर अत्यंत अद्ययावत उपकरण असून, इराण ते चीनकडून खरेदी करते. या इंडस्ट्रियल मिक्सर तयार करणं आणि त्यांची निर्यात करणं खूप कठीण आहे. इराणने मागच्या काही वर्षांमध्ये मोठी किंमत मोजून आयात केले होते. हे हल्ले अगदी अचूक आणि भेदक होते, असा दावा इस्राइलने केला आहे.
या हल्ल्यांमुळे इराणची क्षेपणास्त्र साठ्यांना अद्ययावत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. इस्राइलच्या हल्ल्यांमुळे इराणच्या क्षेपणास्त्र उत्पादन क्षमतेला नष्ट केलं आहे.