परभणी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:46 IST2019-01-07T23:46:31+5:302019-01-07T23:46:56+5:30
महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़

परभणी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़
महावितरण कंपनीने नवीन प्रस्तावित धोरणात शाखा कार्यालये बंद केली असून, कर्मचाºयांची संख्याही कमी केली आहे़ त्यामुळे ग्राहक सेवेवर विपरित परिणाम होत आहे़ अत्यल्प मनुष्यबळावर कर्मचाºयांना काम करावे लागत असल्याने कामाचा ताण वाढला आहे़ नवीन प्रस्तावित रिस्ट्रचरिंगमध्ये कर्मचाºयांची कपात करण्यात आली आहे़ तसेच खाजगी तत्वावर कामे दिली जात आहेत़ यासही संघटनांनी विरोध केला आहे़ यासह इतर अनेक मागण्यांसाठी सोमवारी संप पुकारण्यात आला़ जिल्ह्यातील वीज कर्मचारी संघटना, म़रा़ इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, सबआॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, म़रा़ वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आणि वीज कामगार काँग्रेस आदी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ येथील महावितरणच्या सर्कल आॅफीससमोर सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात आले़ काम बंद ठेवून २५० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील वीज सेवा ठप्प झाली होती़ पंकज पतंगे, किशोर गायकवाड, रमाकांत गायकवाड, इंजिनिअर देवा पवार, जनार्धन चिंचाणे, नाना चट्टे, गवळी, पालकर, भरत तिवार, राजू दुबे आदींसह अनेक कर्मचाºयांनी आंदोलनात सहभाग नोंदविला़
मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडू- खा़ जाधव
महावितरण कंपनीतील कर्मचाºयांचे प्रश्न गंभीर आहेत़ कर्मचाºयांनाच आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत असल्याने हे सरकारचे अपयश असल्याचे नमूद करीत कर्मचाºयांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही खा़ बंडू जाधव यांनी यावेळी दिली़