शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

परभणी : ४६ कोटी रुपये देण्याचे २ कारखान्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:52 AM

एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर व पाथरी तालुक्यातील योगेश्वरी साखर कारखान्यास ऊस दिला होता. या कारखान्यांकडून सदरील शेतकºयांना एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाली नव्हती. चार महिन्यांपासून ही रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदकिले, भाजपाचे जि.प.सदस्य सुभाष कदम आदींनी ६ मे रोजी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुणे येथील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या त्यानुसार सोमवारी सकाळी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन सुरु केले. त्यानंतर साखर आयुक्त गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.त्यानुसार त्यांनी याबाबतचे आदेश काढले. त्यामध्ये गंगाखेड शुगर साखर कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामातील एफआरपीची ३२ कोटी १ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम व लिंबा येथील योगेश्वर शुगर लि.या कारखान्याने त्यांच्याकडील एफआरपीची १४ कोटी ८१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम १५ टक्के देय होणारे व्याज या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेल्या प्रथम प्राधान्याने नॉनप्लेज साखर, मोलॅसीस आणि बगॅस व तद्नंतर आवश्यकतेनुसार प्लेज साखर आदी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून सदर रक्कम वसूल करण्यात यावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. तसेच सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहित पद्धतीने विक्री करुन या रकमेतून ऊस नियंत्रण आदेश तरतुदीनुसार देय बाकी रकमेची खात्री करुन संबंधितांना विलंबित कालावधीत १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याची कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही या आदेशात गायकवाड यांनी नमूद केले आहे.त्यामुळे या कारखान्यांकडे ज्या शेतकºयांची रक्कम थकली आहे, त्यांना त्यांची थकित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पाच साखर कारखान्यांकडे रक्कम थकल्याची केली तक्रार४एफआरपी रकमेसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने साखर आयुक्तांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये गंगाखेड शुगर, योगेश्वर शुगर, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर्स, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कुंटूरकर शुगर्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. आणि हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा साखर कारखाना युनिट १ या पाच साखर कारखान्यांची नावे देण्यात आली आहेत.४या कारखान्यांकडे शेतकºयांची एफआरपीची रक्कम थकल्याचे नमूद केले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष माऊली कदम, शिवाजी नांदखिले, जि.प. सदस्य सुभाष कदम, माऊली जोगदंड, अण्णा जोगदंड, बाळासाहेब जाधव, विश्वनाथ जाधव, प्रकाश कदम, पांडुरंग कदम, किरण जाधव, अशोक कतारे, बालाजी पिसाळ, मुंजाभाऊ शिंदे आदींसह अनेक शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.गंगाखेडमध्ये झाली होती संघटनेची बैठक४शेतकºयांना उसाची थकित एफआरपीची रक्कम मिळावी, यासाठी गेल्या आठवड्यात शेतकरी संघटनेच्या वतीने गंगाखेड येथे बैठकीचे आयोजन केले होते.४यावेळी झालेल्या चर्चेत थकित रकमेसाठी पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी