शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने कार्यकर्ते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:23 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे़ त्यामुळे जि़प़तील भाजपा सोबतची सत्तेतील भागिदारी संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर एकीकडे सडकून टीका केली जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेत मात्र भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे़ त्यामुळे जि़प़तील भाजपा सोबतची सत्तेतील भागिदारी संपुष्टात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे़लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे़ परभणी लोकसभा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे़ त्यामुळे या पक्षानेही कंबर कसली आहे़ त्या दृष्टीकोणातून पक्षाच्या वतीने २३ जानेवारी निर्धार परिवर्तनाचा रॅलीनिमित्त जिंतूर व गंगाखेड येथे जाहीर सभा घेण्यात आल्या़ या जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली़ केंद्रातील भाजपा सरकारला सत्तेतून घालविण्याची वेळ आली असल्याचा हल्लाबोलही केला़ एकीकडे भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची भाषा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र भाजपाला सोबत घेऊनच सत्तेची चव चाखली जात असल्याचा विरोधाभास निर्माण करणारा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे़ याची कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना नसेल; परंतु, पक्षाचे कार्यकर्ते मात्र आता अस्वस्थ झाले आहेत़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपाची युती आहे़ राष्ट्रवादीकडे २४ सदस्य संख्याबळ असले तरी साधारणत: दोन वर्षापूर्वी काँग्रेससोबतच्या अंतर्गत वादातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना ५ सदस्य संख्येचा भाजपा पक्ष जवळचा वाटला़ त्यातून एक सभापती पदही या पक्षाला देण्यात आले़ शिवाय राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेत वेगळा निधी आणता येईल, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा होती़ परंतु, गेल्या दोन वर्षांत भाजपाच्या मदतीने अधिकचा निधी आणण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश आले़ उलट शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांची जिल्हा नियोजन समितीचा निधी देताना दमछाक केली़ त्यामुळे भाजपाचा दोन वर्षांत तरी राष्ट्रवादीला काडीमात्र फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे एकीकडे भाजपावर कडक टीका करायची आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवर याच पक्षाला सत्तेत सहभागी करून घ्यायचे, ही पक्षाची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांना पटलेली नाही़ त्यामुळे ही युती तोडावी, अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे़ याबाबत राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे़काँग्रेससोबत आघाडी करण्यावरून चर्चाजिल्हा परिषदेत साधारणत: दोन वर्षापूर्वी सत्ता स्थापनेच्या वेळी कॉँगे्रस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच वादाची परिस्थिती होती़ गेल्या वर्षभरापासून यात बदल झाला आहे़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्यातील मतभेद गतवर्षी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दूर झाले असून, राज्य व केंद्राप्रमाणे समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आता जिल्हा परिषदेत आघाडी करावी, अशी कार्यकर्त्यांना व सदस्यांना अपेक्षा वाटू लागली आहे़ जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ६ सदस्य असून, भाजपापेक्षा एक सदस्य जास्तीचा आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीच्या एकीचा संदेश जनतेमध्ये जावा, या दृष्टीकोणातून काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जिल्हा परिषदेत व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक