परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:11 IST2019-03-31T00:10:53+5:302019-03-31T00:11:26+5:30

येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे.

Parbhani: Material Theft Against MSEDCL | परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

परभणी : महावितरणच्या गोदामातून पुन्हा साहित्याची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे.
शहरातील महावितरण कंपनीच्या गोदामातून २४ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने वायर, मीटरसह इतर साहित्य असे ६३ हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेला चार दिवस लोटले नाही की, पुन्हा एकदा २८ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्याने गोदामात डल्ला मारला. यावेळी इन्शुलिटर, केबल व कंडक्टर असा ९ हजार ५०० रुपये किंमतीचा माल हाती लागला. या प्रकरणी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन कल्याणकर यांनी पूर्णा पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: Parbhani: Material Theft Against MSEDCL