परभणी: करपरा नदी पुलावर आदळला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:18 IST2019-03-23T00:17:16+5:302019-03-23T00:18:13+5:30

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

Parbhani: Karrapara river collapsed truck | परभणी: करपरा नदी पुलावर आदळला ट्रक

परभणी: करपरा नदी पुलावर आदळला ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी) : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
आंध्रप्रदेश येथून आंबे घेऊन औरंगाबादकडे जात असलेला एपी १६- पीपी ४५५७ क्रमांकाचा ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने देवगावफाटा जवळ असलेल्या करपरा नदीच्या पुलावरील कठड्यांवर हा ट्रक चढला. मात्र अर्धवट स्थितीत तो पुलाच्या कठड्यात अडकल्याने जिवित हानी टळली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर तोंडेवाड, कोल्हाळ, चाटे हे घटनास्थळी दाखल झाले. २२ मार्च रोजी क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाहेर काढण्यात आला व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
परभणीत तलवार जप्त
परभणी- एम.एच.२२- ए.एन. ५२७३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन तलवार नेत असताना पोलिसांनी हनुमान भगवानराव रेंगे यास पकडले असून त्याच्या ताब्यातून ही तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गजानन जंत्रे यांच्या फिर्यादीवरुन कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Parbhani: Karrapara river collapsed truck