शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 23:00 IST

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असतो़ या निधीअंतर्गत कामांचे आराखडे तयार करून ते जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले जातात़ त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती या आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करते़ ही प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेने अनेक कामांना मंजुरी मिळविली होती; परंतु, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाले़ शिवाय पालकमंत्र्यांमध्ये बदल झाला़त्यामुळे नव्याने आलेल्या पदाधिकाºयांचे प्राधान्य बदलले व त्यानुसार त्यांनी कामांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला़ २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला़ त्या प्रस्तावास पालकमंत्री नवाब मलिक यांनी मंजुरी दिली़ त्यानुसार जिल्हा परिषदेने तब्बल १३ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे बदलली आहेत़ 'त्यामध्ये २०१९-२० मधील ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान या अंतर्गत १९ लाखांची ४ कामे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानांतर्गत ४४ लाख ५० हजारांची ४ कामे, लघु सिंचन विभागांतर्गत ७३ लाख रुपयांची ५, लघु पाटबंधारे विभागांतर्गत सिमेंट बंधाºयांची ६३ लाखांची १३, कोल्हापुरी बंधाºयाची १ कोटी ४६ लाखांची ९, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरणांतर्गत १ कोटी ५९ लाख रुपयांची ८ कामे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र देखभाल दुरस्तीचे ८ लाख ५० हजार रुपयांची दोन कामे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम व विस्तारीकरण याचे ६ कोटी ५० लाख रुपयांचे काम तसेच शाळा दुरुस्ती बांधकाम व वर्गखोलीची १६ लाखांची ३ कामे, अंगणवाडी बांधकामाची ३४ लाखांची ३, इतर जिल्हा व रस्ते विकास मजबुतीकरणाची ६३ लाखांची ४, पंचायत समिती लेखाशिर्षाअंतर्गत ५१ लाखा १३ कामे, शाळा दुरुस्ती, वर्ग खोल्या बांधकाम आदीची १ कोटी ४१ लाखांची २८ आणि रस्ते विकास व मजबुतीकरणांतर्गत १० लाख २५ हजार रुपयांचे १ अशा एकूण ९९ कामांमध्ये बदल करण्यात आला आहे़इतिवृत्त झाले तयार४जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांच्या कामांमध्ये बदल केल्यानंतर त्यास २५ जानेवारीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती़ या अनुषंगाने तयार करण्यात आलेले इतिवृत्त १२ मार्च रोजी समितीच्या सदस्यांना पाठविण्यात आले़ त्यामुळे तब्बल ४७ दिवस या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यास प्रशासनास वेळ लागल्याचे समोर आले आहे़ साहजिकच बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी त्यामध्ये करण्यात येणारे बदल हे नंतरही निश्चित केले जातात़ त्यानंतरच या संदर्भातील इतिवृत्त तयार करण्यात येते़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद