शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

परभणी : टंचाईच्या कामांसाठी सव्वा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:23 AM

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाला १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाला आहे़ त्यामुळे टंचाई निवारणाची कामे करणाऱ्या यंत्रणांची चिंता मिटली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाला १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाला आहे़ त्यामुळे टंचाई निवारणाची कामे करणाऱ्या यंत्रणांची चिंता मिटली आहे़जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ आॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली़ ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या़ दरवर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणाचे कामे केली जातात़ मात्र यावर्षी टंचाईचे संकट अधिक तीव्र असल्याने आॅक्टोबर ते जून या ९ महिन्यांमध्ये जिल्हावासियांना पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले होते़ यासाठी विविध कामांचा सुमारे ४२ कोटी रुपयांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला होता़ या आराखड्यानुसार कामे हाती घेण्यात आली़टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करणे, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, विहीर, बोअरचे अधिग्रहण या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पाणी पोहचविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले़आतापर्यंत केलेल्या कामांवर झालेल्या खर्चाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे नोंदविली होती़ जिल्हा प्रशासनाला ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी करावयाच्या कामांपोटी १ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ त्यातुलनेत विभागीय आयुक्तांनी १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाºयांच्या खात्यात वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे़ जिल्हा प्रशासनाला हा निधी मंजूर झाल्याने पाणीटंचाईवर झालेला खर्च भागविणे यामाध्यमातून सोपे जाणार आहे़महानगरपालिकेला १० लाखांचा निधी४पाणीटंचाईच्या काळात महापालिका क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने परभणी महापालिकेला २२ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती़ त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण करणे आणि इतर कामांचा समावेश होता़४परभणी मनपाने केलेल्या टंचाईच्या कामापोटी जिल्हाधिकाºयांना १० लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ हा निधी महापालिकेला वर्ग करण्यात येणार आहे़ त्यामुळे परभणी शहर हद्दीत टंचाई निवारणाच्या कामांसाठीही निधी मिळाला आहे़वीज पुरवठ्यासाठी अडीच कोटीउन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल, टंचाई आराखड्यातून जमा करण्यास मान्यता दिली होती़ परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा केवळ थकबाकीमुळे खंडीत होवू नये, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात आली होती़ त्याप्रमाणे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची रक्कम जिल्हा प्रशासनाने जमा केली आहे़ यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत २ कोटी ६८ लाख ६ हजारांचा निधी मंजूर केला आहे़सहा महिन्यांत ३ कोटी ३८ लाखांचा निधी प्राप्त४जिल्हा प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून टंचाई निवारणाची कामे हाती घेतली आहेत़ यावर्षी शासनाने टंचाईच्या कामासाठी वेगळा निधी मंजूर केला होता़४त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या मागणीप्रमाणे निधीची पूर्तता करण्यात आली आहे़ यापूर्वी प्रशासनाने १ कोटी ९९ लाख ३४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़४आता विभागीय आयुक्तांनी १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपये मंजूर केले आहेत़ त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला ३ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़जून महिन्यातही पाणीटंचाईची कामेयावर्षी पावसाळा लांबल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे़ अजूनही अनेक भागांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ कृती आराखड्याच्या नियोजनानुसार पाणीटंचाई निवारणाची काम ३० जूनपर्यंतच प्रस्तावित केली होती़ मात्र पाणीटंचाई आणखी तीव्र होत असल्याने या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे़ त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई आहे, अशा ठिकाणी प्रशासन उपाययोजना करीत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळfundsनिधी