परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST2018-05-13T00:36:00+5:302018-05-13T00:36:00+5:30
बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.
२०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया गेल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. या शेतकºयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करुन राज्य शासनाकडे १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मागणी केली होती.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक अध्यादेश काढून राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर केली. परभणी जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार आहे.
१५७ कोटी रुपयांचे तीन समान टप्पे करण्यात आले असून त्यात ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या याद्याप्रमाणे हे अनुदान त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या खात्यावर वितरित केले आहे. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष शेतकºयांना अनुदानाच्या वाटपास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले असले तरी शेतकºयांच्या खात्यावर त्यांच्या नुकसानीची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप होणार आहे. ऐन पेरणी हंगामाच्या पूर्वी बोंडअळीचे पैसे खात्यात पडणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
परभणी तालुक्याला सर्वाधिक निधी
जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक तालुक्याला निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्यात परभणी तालुक्याला सर्वाधिक ६ कोटी ८८ लाख ९१ हजार ७३६ रुपये, सेलू तालुक्याला ६ कोटी ५९ लाख ७९ हजार ९६७ , जिंतूर तालुक्याला ६ कोटी ४३ लाख ११ हजार ९१८, पाथरी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७, मानवत ५ कोटी ३२ लाख ९१ हजार ४२०, सोनपेठ ४ कोटी २० लाख २५ हजार २२३, गंगाखेड ३ कोटी २६ लाख १ हजार २१, पालम ३ कोटी ४ लाख २५ हजार ५६५ आणि पूर्णा तालुक्याला २ कोटी १४ लाख ४३ हजार ९२३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
५२ कोटींचा मिळाला पहिला हप्ता
राज्य शासनाकडे जिल्ह्याने १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मागविली होती. त्याचा पहिला हप्ता ५२ कोटी ६६ लाख रुपये शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी बिम्स् प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे. हा संपूर्ण निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.