परभणी : विरोधकांच्या बोलण्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये-महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:45 IST2018-10-20T00:45:04+5:302018-10-20T00:45:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड ( परभणी ) : विरोधकांकडून रत्नाकर गुट्टे यांच्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे शेतकºयांनी ...

परभणी : विरोधकांच्या बोलण्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये-महादेव जानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : विरोधकांकडून रत्नाकर गुट्टे यांच्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे शेतकºयांनी विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माकणी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.
तालुक्यातील माकणी येथे गंगाखेड शुगरच्या दहाव्या गळीत हंगामाच्या शुभारंभाची मोळी जानकर यांच्या हस्ते शुक्रवारी टाकण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.सुरेश धस तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.विनायकराव पाटील, आ.मोहन फड, गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे, बाबासाहेब दौडतले, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, अग्नीहोत्री यज्ञेश्वर महाराज सेलूकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, विजयराज नांदेडकर, महंत कैलासगिरी महाराज, नगरसेवक सत्यपाल साळवे, जि.प.सदस्य किशन भोसले, राजेश फड, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद ओझा, प्रमोद मस्के, सुरेश भूमरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, येणाºया अडचणीवर मात करुन पुढे जाणाराच इतिहास रचत असतो. त्यामुळे रत्नाकर गुट्टे यांनी न डगमगता चालावे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. शेतकºयांनी विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता, गुट्टे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना कारखाना चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना आ. धस म्हणाले की, सभागृहात कोणावरही बेछुट आरोप करताना सभागृहाचे पावित्र्य राखून जबाबदारीने विधान करावे. यावेळी आ.फड, आ.चिखलीकर, आ.जाधव, दस्तापूरकर आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सीईओं डोंगरे तर सूत्रसंचालन पालमकर आणि आभार राजेश फड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, दत्तात्रय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
४मी हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा सभागृहात आरोप करणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहाबाहेर आरोप करावेत. माझ्यावर किती कर्ज आहे, हे मीडियासमोर दाखवावे, चर्चेसाठी मी तयार आहे, असे यावेळी चेअरमन रत्नाकर गुट्टे म्हणाले. खोटे आरोप करुन गंगाखेड शुगर कारखाना सुरु होऊ द्यायचा नाही, यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरु आहेत. उलट मुंडे यांनी जुने दिवस आठवून २-२ लॅण्ड क्रुझर, पुण्याचा फॉर्म हाऊस आदी मालमत्ता घेण्यासाठी पैसा कोठून आणला, हे सांगावे, कारखाना उभा करण्यासाठी जमा केलेले २५ कोटी रुपयांचे शेअर कोठे गेले, ते सांगा. शेतकºयांना त्यांच्या पैशाचा हिशोब द्या, असे आव्हान यावेळी गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना दिले.