शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

परभणी : जेसीबीसाठी कर्मचाऱ्यांचा वाढला मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:46 IST

तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी शेताततच मुक्काम करावा लागला. दोन मशिन चालकांनी एकूण १५ लाखांचा दंड २९ रोजी भरल्याने त्या सोडून देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी शेताततच मुक्काम करावा लागला. दोन मशिन चालकांनी एकूण १५ लाखांचा दंड २९ रोजी भरल्याने त्या सोडून देण्यात आल्या आहेत.गौंडगाव, मैराळ सावंगी शिवारात गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्यावर जेसीबी मशिनच्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने २६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी मोठ्या शिताफीने कापूस बियाणांचा प्रचार करणाºया वाहनातून प्रवास करीत वाळू धक्यावर जाऊन सिनेस्टाईल कार्यवाही केली. यावेळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा करणारी वाहने व पोकलेन मशीन पाठलाग करून पकडली. या कारवाईत पकडलेली हायवा वाहने त्याच दिवशी सोनपेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. मात्र पाठलाग करून पोकलेन मशीन गोदावरी नदीपात्रापासून चार ते पाच कि.मी. अंतरावरील शेतात पकडली. पोकलेन चालकांनी मशीन सुरु होणारे साहित्य काढून नेल्यामुळे जप्त तिन्ही जेसीबी मशीन चालू होत नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड येथील मंडळ अधिकारी, तलाठी, गौंडगावचे पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या ताब्यात या मशीन देण्यात आल्या. २६ मे रोजी पकडलेल्या या मशीन सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध झाली नाही. या मशिनला नेण्यासाठी वाहन येत असल्याच्या प्रतीक्षेत महातपुरी मंडळाचे मंडळ अधिकारी उद्धव सरोदे, तलाठी चंद्रकांत साळवे, अक्षय नेमाडे, वाकळे, सुक्रे, मुलंगे, अव्वल कारकून रघुराम जाधव, नागनाथ यरंडवाड, पोलीस पाटील व्यंकटी जाधव, सोनपेठ पोलीस ठाण्याचे सपोउपनि देवराव मुंडे, जमादार रामराव तांदळे, सुधाकर मुंडे हे २६ मे पासून २९ मे पर्यंत हातावरची सर्व कामे सोडून मशीन सांभाळण्यासाठी गौंडगाव शिवारातील कºहाळे यांच्या शेतातच तब्बल चार दिवस मुक्कामाला आहेत.प्रत्येक मशीनला साडेसात लाख दंडगोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करताना मिळून आलेल्या तिन्ही पोकलेन मशिनला सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचाºयांना मशीन सांभाळण्यासाठी गौंडगाव शेत शिवारातच मुक्काम ठोकावा लागला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रत्येकी एका मशीनला साडेसात लाख रुपयांचा दंड आकारल्याची व दंडाची रक्कम भरल्यास या मशीन सोडून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार जीवराज डापकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.१५ लाखांचा भरला दंडगौंडगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करताना पकडलेल्या जेसीबी मशिनला जिल्हाधिकाºयांनी प्रत्येकी साडेसात लाख रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर ३ पैकी २ जेसीबी मालकांनी १५ लाख रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाकडे जमा केला. त्यानंतर २९ मे रोजी या मशीन सोडून देण्यात आल्या.दंड भरून सोडलेले मशीन पुन्हा वाळू धक्यावरतहसील प्रशासनाने आकारलेला दंड भरून सोडून देण्यात आलेल्या दोन्ही पोकलेन मशीन मालकांनी आपल्या जेसीबी मशिन गौंडगाव येथील वाळू धक्यावर नेऊन ३० मे रोजी पहाटे पासून नव्या जोमात वाळू उपसा सुरू केल्याचे गौंडगाव येथील ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आले आहे.तलाठ्यांची कामे खोळंबलीजिल्हाधिकाºयांनी पकडलेल्या तीन जेसीबी मशीन सांभाळण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाºयांना चार दिवस शेतात मुक्काम करावा लागला. यामध्ये महातपुरी, धारासूर, सुप्पा, खळी या सज्जा अंतर्गत येणाºया शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थांना तलाठ्यांच्या शोधात गंगाखेड शहर गाठावे लागले. मात्र येथे सुद्धा तलाठ्यांची भेट न झाल्याने अनेक कामे खोळंबली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसTahasildarतहसीलदारsandवाळू