शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

परभणी : पावसाचा ताण पडल्याने पोळ्यावर दुष्काळाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 AM

‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस आता परत येण्याची शक्यता मावळली असून, अशा निराशेच्या वातावरणात पोळा सण साजरा करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी जुनी म्हण आहे. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस आता परत येण्याची शक्यता मावळली असून, अशा निराशेच्या वातावरणात पोळा सण साजरा करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.कृषी संस्कृतीतीत महत्त्वाचा आणि वर्षभर शेतात राबणाºया बैलांचा सन्मान करणारा हा सण ३० आॅगस्ट रोजी साजरा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजण्याच्या अवस्थेत आहेत. एकीकडे खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे पोळा सण साजरा करावा लागत आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांना आंघोळ घातली जाते. मात्र बैलांना धुण्यासाठीही पूर्णा नदी किंवा ओढ्यात पाणीसाठा नाही. वर्षभर ज्यांच्या मानेवर जू असतो, अशा बैलांचे खांदे मळण्यात येतात. पोळ्याला खांदे मळण्याचे विशेष महत्त्व असते. त्यानंतर पुन्हा एकदा बैलांना आंघोळ घातली जाते. गोंडे, फुगे, चंगाळी, झुली, बाशिंग बांधून बैलांचा साज केला जातो. गावातील मारुतीच्या पारावर जाऊन प्रदक्षिणा घातली जाते. घरी गाय व बैलांची एकत्रित पूजा करुन बैलांना पुरण पोळी खाऊ घातली जाते. ‘यंदा बºयापैकी पीक येऊ दे’ असा आशिर्वादही घेतला जातो. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने सर्वत्र शांतता दिसून येत आहे. साध्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.येलदरी येथील आठवडी बाजारात पोळ्यानिमित्त बैलांचा साज खरेदी करण्यासाठी गर्दी झाली खरी. मात्र दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना साज खरेदी करताना आखडता हात घ्यावा लागत आहे.पोळा सणामुळेच चिंतेत पडली भर४पोळा सणापर्यंत पाऊस पडण्याची शाश्वती असते़ मात्र पोळ्याचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकºयांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत़ या सणानंतरही पाऊस होईल अशी अपेक्षाही नसते़ त्यामुळे शेतात उभी असलेली पिके कशी जगवायची? याची चिंता शेतकºयांना लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीMarketबाजार