परभणी :जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:45 IST2018-06-04T00:45:13+5:302018-06-04T00:45:13+5:30
तालुक्यातील गवळी पिंपरी शिवारातून गिट्टीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी पकडले आहेत.

परभणी :जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले ट्रक
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील गवळी पिंपरी शिवारातून गिट्टीची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी पकडले आहेत.
सोनपेठ तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासन सतर्क केले आहे. त्या अंतर्गत पोहंडूळ व लासिना येथील वाळू धक्क्यांवर केलेली कारवाई ताजी असतानाच ३ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व महसूल कर्मचाºयांनी गवळी पिंपरी शिवारातून अवैधरीत्या गिट्टीची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले आहेत. हायवा ट्रक क्रमांक एम.एच.४४ -यू ०४८९ व एम.एच.३६ एफ ५५२ हे दोन्ही ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
या ट्रकचालकांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई
पूर्णा- कान्हडखेड शिवारातील नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने २ जून रोजी कारवाई केली असून ३ जून रोजी या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. कान्हडखेड शिवारात शनिवारी सकाळी ११ वाजता नदी पात्रातून ४ ब्रास वाळूची वाहतूक करणारा ट्रक पूर्णा शहरातील डपिंग ग्राऊंड जवळ नायब तहसीलदार वंदना मस्के, शिवप्रसाद वाव्हळे, मंडळ अधिकारी राजूरकर, तलाठी मनिष गुंगे यांनी पकडला. ट्रकच्या सोबत असलेल्या एका दुचाकी चालकासमवेत ट्रक चालकाने पळ काढला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार सय्यद मोईन तपास करीत आहेत.