परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:52 IST2018-11-12T23:52:08+5:302018-11-12T23:52:38+5:30
जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़
पूर्णा तालुक्यातील दगडवाडी, वझूर शिवारातील शेतकºयांना जायकवाडीच्या कालव्याचे पाणी मिळाले नाही़ या शिवारात कालव्याची बी-६८ क्रमांकाची वितरिका आहे़ येथील शेतकºयांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाला वारंवार कळवूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतकरी कार्यालयात दाखल झाले़ कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते़ शेतकºयांनी दुपारी १२़३० वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली; परंतु, सलगरकर शेतकºयांचे म्हणणे ऐकण्यासाठी आले नाहीत़ दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास या शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़ दरम्यान, हे आंदोलन सुरू असतानाच कार्यकारी अभियंता सलगरकर कार्यालयात दाखल झाले; परंतु, संतप्त शेतकºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्यासही नकार दिला़
आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना अपमानित करणारे कार्यकारी अभियंता सलगरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे़ निवेदनावर बबनराव पवार, तय्यब खान पठाण, सुदाम वाघमारे, माणिकराव वाघमारे, हरिचंद्र वाघमारे, यशवंत पवार, गोडाजी वाघमारे, जायकोबा गलांडे, प्रभाकर पारडकर आदींची नावे आहेत़