परभणी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 23:26 IST2020-04-21T23:26:17+5:302020-04-21T23:26:52+5:30
तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील धार शिवारामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूलच्या पथकाने जप्त केले असून या प्रकरणी १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास तहसीलदार विद्याचरण कडवकर व त्यांच्या पथकाने धार शिवारामध्ये ही कारवाई केली. त्यावेळी एम.एच.०४-डीएस ७६३५, एम.एच.४३ वाय १०७२ आणि एम.एच. ०६ एसी ४९२० या टिप्परमधून वाळूची वाहतूक होत असल्याची बाब निदर्शनास आली. पथकाने हे तिन्ही टिप्पर जप्त केले आहेत. तसेच एम.एच.४३-यू.३५९३ या टिप्परच्या चालकाने या भागातून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी मंडळ अधिकारी गजानन कण्व यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये टिप्पर चालक, मालक व मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार विद्याचरण कडवकर, माणिक गिरी, कोतवाल आकाश मोरे, प्रियेश हिंगे, गिरीष देशमुख यांच्या पथकाने केली. या कारवाई दरम्यान, अमोल बुचाले, दयानंद भिसे, सिद्धार्थ रायबोले, दिनेश बाणमारे, अनिल गवळी, दत्ता रगडे, संतोष चोपडे, अंकुश चोपडे, बाळू ऊर्फ विष्णू चोपडे, केदार चोपडे, परमेश्वर चोपडे, शिवाजी चोपडे, दत्तराव चोपडे, मधुकर चोपडे, आकाश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे या १६ जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे वाळू चोरी बरोबरच आरोपींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग अधिनियमानुसारही गुन्हा नोंद झाला आहे.