कारमध्ये अचानक स्फोट अन् काही मिनिटांतच गाडीचा कोळसा; सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील थरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:02 IST2026-02-20T19:02:13+5:302026-02-20T19:02:57+5:30
सोनपेठ-पाथरी रस्त्यावर धावत्या कारला आग; स्फोटाचा आवाज झाला अन् चालक बाहेर पडला

कारमध्ये अचानक स्फोट अन् काही मिनिटांतच गाडीचा कोळसा; सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील थरार!
सोनपेठ (परभणी): सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील दुधगाव शिवारात शुक्रवारी दुपारी 'बर्निंग कार'चा थरार पाहायला मिळाला. भररस्त्यात एका धावत्या कारला अचानक भीषण आग लागली. कारमध्ये स्फोटाचा आवाज होताच चालकाने प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, विटा खुर्द येथील सय्यद जकीर हे आपल्या कारमधून (MH-12-PQ-0441) विटा येथून सोनपेठकडे येत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची कार दुधगाव शिवारात आली असता, अचानक कारमध्ये स्फोटाचा मोठा आवाज झाला.
परभणी जिल्हयातील सोनपेठ-पाथरी रस्त्यावर धावत्या कारला आग; स्फोटाचा आवाज झाला अन् गाडी जळून खाक #parabhani#marathwadapic.twitter.com/HhoUDuM1ug
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 20, 2026
स्थानिकांनी धाव घेतल्याने आग आटोक्यात
स्फोटाचा आवाज ऐकताच सय्यद जकीर यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी थांबवली आणि ते बाहेर पडले. ते बाहेर येताच काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले. जवळच शेतात काम करत असलेल्या सय्यद सादिक आणि सय्यद मतीन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भररस्त्यात लागलेल्या आगीमुळे वाहनधारकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.