परभणी : बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:37 IST2020-02-22T00:37:07+5:302020-02-22T00:37:31+5:30
तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़

परभणी : बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़
मानवत रोडवरील सेलू कॉर्नरजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे़ सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेचे कर्मचारी आपले कामकाज आटोपून २० फेब्रुवारी रोजी बँक बंद करून गेले होते़ मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला़ बँकेत असलेल्या तिजोरीला फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून केला गेला असल्याचे दिसून आले़ मात्र काहीही हाती न लागल्याने चिडलेल्या चोरट्यांनी काचेचे दरवाजे फोडून जवळपास १ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले़ प्राथमिक माहितीनुसार बँकेतील काहीही चोरीला गेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार, प्रताप साळवणे, जमादार फारुखी यांनी घटनास्थळी धाव घेवून ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले़