परभणी : तलवारीच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:41 IST2018-06-07T00:41:47+5:302018-06-07T00:41:47+5:30

पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Parbhani: An attempt to rob by the sword | परभणी : तलवारीच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

परभणी : तलवारीच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक संजय बोरोकर यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पूर्णा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाकडून तिघे जण तलवारीचा धाक दाखवून २०० रुपये बळजबरीने हिसकावून घेत होते़ ही बाब निदर्शनास आल्यानंतर आरोपींनी पोलिसांनाही धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला़ या प्रकरणी तीन आरोपींविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडील तलवार ताब्यात घेतली आहे़ पोलीस उपनिरीक्षक ए़जी़ लांडगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: An attempt to rob by the sword