शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : औषधी खरेदीचे १ कोटी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:49 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीसाठी २०१९-२० या वर्षाकरीता ६४ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील ३८ लाख १४ हजार रुपये जिल्हा आरोग्य कार्यालायकडे वितरित करण्यात आले होते. डिसेंबर अखेर त्यातील रुपयाही या कार्यालयाने खर्च केलेला नाही. या शिवाय जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाकरीता औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीकरीता ६० लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात मंजूर करण्यात आली होती. त्यातील ३६ लाख रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला जिल्हा नियोजन समितीने वितरित केले होते. या कार्यालयाने डिसेंबर अखेर यातील एक दमडीही खर्च केली नाही. याच कार्यालयाला उपजिल्हा रुग्णालयाकरीता औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र खरेदीकरीता ४० लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्यातील २४ लाख रुपये या कार्यालयास वितरित करण्यात आले. यातीलही निधी खर्च करण्यास या विभागाला अपयश आले. त्यामुळे एकीकडे रुग्णांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर औषधी मिळत नाहीत. त्यामुळे नाविलाजाने खाजगी दुकानांतून औषधींची खरेदी करावी लागते आणि दुसरीकडे मात्र या विभागाने एकूण ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधी अखर्चित ठेवला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांचा हा निष्काळजीपणा रुग्णांच्या मुळावर आला. आता या तिन्ही विभागांकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेला एकूण १ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत खर्च करावा लागणार आहे. अन्यथा मार्च अखेरीस तो निधी अखर्चित राहिल्यास तो शासनाला समर्पित करावा लागणार आहे. परिणामी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाºया गरजुंना याचा फटका सहन करावा लागणार आहे.नवीन वर्षात ५ कोटी ८३ लाखांची तरतूद४२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरीता औषधी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी ९९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तर ग्रामीण रुग्णालयातील औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्रीसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाकरीता औषधी खरेदी, साधन सामुग्री व यंत्र सामुग्री खरेदीसाठी १ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षासाठी या तीन हेडअंतर्गत मंजूर झालेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत आरोग्य विभागाला खर्च करता आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षात नव्याने तरतूद केलेल्या निधी खर्चाचे नियोजन या विभागाला गांभीर्याने करावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल