परभणी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महापालिकेप्रमाणेच काँग्रेस व उद्धवसेनेने आघाडीत लढण्याचे जवळपास निश्चित केल्यानंतर जागावाटपात बोलणी फिस्कटली. काँग्रेस आता वंचित व रासपशी चर्चा करीत आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या आघाडीची बोलणी सुरू असून, अजून अंतिम झाली नाही. चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे.
परभणी जिल्हा परिषदेत मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार)कडून ही सत्ता राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा पक्ष एकला चलो रे... अशी भूमिका घेताना दिसत आहे. आमदार राजेश विटेकर यांनी आधीपासूनच उमेदवार तयार केल्याने त्यांना युतीत बसणे अवघड बनले होते. महापालिकेच्या निकालानंतर भाजपला संख्याबळाचे गणित जुळविण्यासाठी युतीचे महत्त्व वाटू लागले आहे. मात्र, राज्यातील सत्तेत मोठा भाऊ असल्याने त्यांना त्यांच्या कलाने जाणारा मित्रपक्ष हवा आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळीही युतीसाठी आग्रही आहेत. त्यांचा हिरवा कंदील असताना शिंदेसेनेशी मनपा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात बोलणीत जुळले नाही. यावेळी तर आता नेमकीच बोलणीची दारे उघडली आहेत. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली तरीही त्यांनी दिलेले उमेदवार कोणत्या चिन्हावर लढवायचे? यावर गुऱ्हाळ सुरू आहे.
काँग्रेस व उद्धवसेनेने आघाडीत लढण्यासाठी बैठका घेतल्या. मात्र, त्याची फलश्रुती दिसून येत नाही. मनपातील निकालामुळे या दोन पक्षांतील नेत्यांची मने जुळल्यासारखे वाटत होते. उद्धवसेनेचे खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, तुकाराम रेंगे, सुरेश देशमुख आदींची प्राथमिक चर्चाही एका बैठकीत झाली. मात्र, ग्रामीण भागातील जागा वाटपात परिस्थिती बिघडण्याची चिन्हे आधीपासूनच दिसत होती. त्यावर मैत्रिपूर्ण लढतीचा फंडाही काढला होता. मात्र, स्वतंत्र जागा कमी अन् याच लढती जास्त होण्याची शक्यता वाढत होती. यामुळे उद्धवसेनेला सोडण्याची तयारी काँग्रेसने केली.
वंचित, रासपशी काँग्रेसची बोलणी होणारउध्दवसेना सोडून काँग्रेस आता वंचित व रासपच्या हातात हात घालण्याच्या तयारीत दिसत आहे. यासाठी बोलणी सुरू केली आहे. यातही यश येणार की नाही? हे उद्या कळणार आहे. मात्र, दुर्राणी यांनी या नव्या आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादी (श.प.)चे गणित कळेनाराष्ट्रवादी (शरद पवार)ची भूमिका मात्र अजून कळायला मार्ग नाही. ते मनपाला युतीतील राष्ट्रवादी (अजित पवार)सोबत गेले. सहा जागा लढल्या. एकही जिंकली नाही. नगरपालिका निवडणुकीतही तेच हाल झाले. जिल्हा परिषदेत काय होते, ते लवकरच कळणार आहे.
Web Summary : Parbhani ZP election alliances uncertain as Congress-Shiv Sena talks fail. Congress seeks alliance with Vanchit Bahujan Aghadi and Rashtriya Samaj Paksha. BJP-Shinde Sena talks are ongoing.
Web Summary : परभणी ZP चुनाव में कांग्रेस-शिवसेना गठबंधन विफल होने से अनिश्चितता। कांग्रेस वंचित बहुजन आघाडी और राष्ट्रीय समाज पक्ष के साथ गठबंधन चाहती है। बीजेपी-शिंदे सेना की बातचीत जारी है।