शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी अनलॉकच्या तिसऱ्या गटात; सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवहारास मुभा, विकएन्ड लॉकडाऊन राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:38 IST

परभणी जिल्ह्यात सायंकाळी चार वाजेपर्यंत व्यवहार सुरू

ठळक मुद्देदोन महिन्यानंतर खाजगी वाहतूक सुरूएसटी महामंडळाची  बससेवा ही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी

परभणी : कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होत असून सोमवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवे संबंधित सर्व दुकाने तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य स्तरावर निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्के असून ऑक्सिजन बेडची व्याप्ती १६ टक्के असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश रविवारी दुपारी काढले.

या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेसह संबंधित सर्व दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता असलेली दुकाने शनिवार, रविवार बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद राहतील.  रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेवर सुरू सुरू राहणार असून शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदाने, खाजगी आस्थापना कार्यालये, शासकीय कार्यालय, खेळाची मैदाने, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्नसमारंभासाठी ५० जणांची आणि अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. व्यायाम शाळा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत.

दोन महिन्यानंतर खाजगी वाहतूक सुरूजिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे तब्बल दोन महिन्यानंतर खाजगी वाहतूक सुरू करण्यास तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रवास करीत असताना केवळ टप्पा क्रमांक पाचमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी संबंधितांना ई पास घेणे आवश्यक राहणार आहे. एसटी महामंडळाची  बससेवा ही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. मालवाहतूकही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस