महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेत बुधवारी विज्ञान विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अॅपवर आल्याची बाब समोर आली आहे. ...
बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले ...
महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत; परंतु, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत़ यासाठी महिलांनीच अन्याय, अत्याचार सहन न करता लढा देऊन सक्षम बनावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनी केले़ ...
तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ ...
सरत्या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात १८ हजार ३८२ नवीन वाहनांची भर पडली आहे. यातून एका वर्षात वाहनाच्या खरेदी-विक्रीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ३४ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. प ...
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ४ लाख ५९ हजार ६९२ बचत खाते उघडण्यात आले असून या माध्यमातून ५० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती शासनाने जाहीर केली आहे. ...