निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. ...
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. ...
पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवण्याचा या पक्षाच्या नेत्यांनी हट्ट कायम धरला असून गंगाखेडच्या जागेवरही सेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात रविवारी मुंबईत पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. ...
जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत फक्त १६.५८ टक्केच पीक कर्ज वाटप विविध बँकांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी दाखविलेला कंजुषपणा समोर आला आहे. ...
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील १७४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून १५ प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ...