In Parbhani district, only 1.5 per cent crop loan is allotted | परभणी जिल्ह्यात फक्त १६.५ टक्के पीक कर्ज वाटप

परभणी जिल्ह्यात फक्त १६.५ टक्के पीक कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत फक्त १६.५८ टक्केच पीक कर्ज वाटप विविध बँकांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी दाखविलेला कंजुषपणा समोर आला आहे.
परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाच्या कर्जाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले होते.
त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १६.५८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागले आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही.
शेतकºयांनी खाजगी सावकारांची दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील वाणिज्य, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांनी ४३ हजार ९०९ शेतकºयांना २४३ कोटी ८३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. अद्यापही अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे.
असे वाटप झाले पीक कर्ज
४यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले होते. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ८३० शेतकºयांना ६६ कोटी ९२ लाख रुपये दिले.
४ खाजगी बँकांनी १ हजार ६९२ शेतकºयांना २७ कोटी ५५ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७७ शेतकºयांना ५५ कोटी ८७ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ हजार ८१६ शेतकºयांना ९३ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही.
दीड लाख शेतकरी अद्यापही वंचित
४गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप केले होते; परंतु, यावर्षीचा खरीप हंगाम संपत आलेला असताना आतापर्यंत केवळ ४४ हजार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.
४त्यामुळे अद्यापही जवळपास दीड लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे बँक प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्ज वाटपासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करुन लाभार्थी शेतकºयाला लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: In Parbhani district, only 1.5 per cent crop loan is allotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.