परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने एक वर्षापूर्वी मंजुरी दिली खरी; परंतु, अद्यापही बसपोर्टच्या कामास गती मिळत नसल्याने परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला अधिकारी व संबंधित गुत्तेदारांकडून खीळ बसत आहे. ...
उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ...
जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी हंगाम पुरता हातचा निघून गेला असून या संकटाच्या काळातच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या महिन्यात सर्वाधिक १४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ७ ...
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी, महसूल विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने एकत्रित केले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादरही केला आहे. मनुष्य बळाच्या अभावामुळे कृषी विभागाच्या पंचनाम्यावरच अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कं ...
जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. ...
शहरातील डॉक्टरलेन भागातील खाजगी वसतिगृहातील दोन शाळकरी मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार मंगला मुद्गलकर यांचा २९ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवान वाघमारे विजयी झाले आहेत. ...
काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे. ...
तालुक्यात काही भागात नित्याच्या बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून तालुक्यात पंचायत समितीकड ...
महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...