जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेंद्रीय शेती हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:40+5:302021-02-24T04:18:40+5:30

सेलू तालुक्यातील शेलवाडी येथे २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शास्वत शेती उपक्रमातंर्गत जमीन आरोग्य पत्रिका जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Organic farming is the only way to improve soil health | जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेंद्रीय शेती हाच पर्याय

जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेंद्रीय शेती हाच पर्याय

सेलू तालुक्यातील शेलवाडी येथे २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शास्वत शेती उपक्रमातंर्गत जमीन आरोग्य पत्रिका जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी अधिक्षक संतोष आळसे बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ प्रा.अंकुश वादेकर, तालूका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मंडळ अधिकारी डी.एस.तोष्णीवाल,सरपंच नानासाहेब वाघमोडे,राजेभाऊ निर्वळ यांची उपस्थिती होती. सर्व रक्तवाहीण्या चांगला आसतील तरच मनुष्याचे शरीर चांगले राहते. अन्यथा मनुष्याला ह्रदयविकाराच्या आजाराचा सामना करावा लागतो.आगदी त्याच प्रमाणे जमीनीच्या सर्व रक्तवाहिन्या सुरूळीतपणे चालण्यासाठी शेंद्रीय शेती पध्दतीचा आवलंब करणे गरजेचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीत शेणखताचा वापर अधीक करून रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. याशिवाय कापसाच्या पर्हाटीचा जागेवरच भुसा केला पाहिजे असे आळसे यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजन कृषी सहाय्यक अनिल घुमरे यांनी केले.या वेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Organic farming is the only way to improve soil health