शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:42 AM

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यामध्ये ९२ हजार कृषीपंप धारक आहेत़ या कृषीपंपांना वीज वितरण कंपनीच्या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो; परंतु, जिल्ह्यात १३२ केंद्रांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असल्याने जिल्ह्यातील ३३ केव्ही उपकेंद्रांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही़ परिणामी कृषीपंपधारकांना सुरळीत वीज पुरवठयासाठी रात्र-रात्र वाट पहावी लागते़ विशेष म्हणजे दिवसभर सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव रात्रीच्या वेळी आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते़ पाणी देण्याचे काम करीत असताना अनेक शेतकºयांना साप, विंचू आदींनी दंश केल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले़ या घटनांना आळा घालण्यासाठी व शेतकºयांना दिवसभर सुरळीत वीज पुरवठा मिळण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली़सौर कृषीपंप योजना शेतकºयांच्या हिताची असल्याने वीज वितरण कंपनीनेही ग्रामीण भागात जावून या योजनेबाबत जनजागृती केली. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला़ आॅनलाईन प्रणालीच्या माध्यामातून जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले़ त्यापैकी ५ हजार ८१७ प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली़ मंजुरी दिलेल्या प्रस्तावांना टाटा पॉवर सोलार, सीआरआय पंप, रविंद्रा एनर्जी, मुद्रा सोलार, जैन इरीगेशन या सौर कंपन्यांची निवडही करण्यात आली़या कंपन्यांकडून लाभार्थी शेतकºयांना सौर कृषीपंप त्यांच्या शेतात उभारून देण्यात येत आहेत; परंतु, कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ही योजना सुरू होवून वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी १० हजार ३४४ शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंप उभारून देण्यात आले आहेत़ उर्वरित ८ हजार ९३४ शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत लाभार्थी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे लाभ का मिळत नाही? याबाबत हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत; परंतु, आमच्या हाती काहीच नसून सर्व आॅनलाईन आहे़ त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाशीच याबाबत विचारणा करावी, असे प्रत्युत्तर मिळत असल्याने लाभार्थी कृषीपंपधारक हैराण झाले आहेत़याकडे नव्याने रुजू झालेल्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देवून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे़एजन्सी निवडीचा पर्याय कधी बंद; कधी सुरू!४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकºयांना परिपूर्ण प्रस्तावांसह आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाचा आहे़ अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी ज्या कंपनीकडून सौर कृषीपंप आपल्या शेतात बसून घ्यायाचा आहे़ त्या कंपनीची निवड करणे अपेक्षित आहे; परंतु, आॅनलाईन प्रणालीवर एजन्सी निवडण्याचा पर्याय दुसºया टप्प्यामध्ये केवळ आठच दिवस सुरू राहिला़ त्यानंतर हा पर्याय कधी बंद तर कधी सुरू राहत आहे़ त्यामुळे या पर्यायाच्या लपंडावाने लाभार्थी शेतकरी हैराण झाले आहेत़ जवळपास १८ हजारांचा लोकवाटा भरूनही आपल्याला लाभ मिळतो की नाही? या विवंचनेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़३ हजार ९२० प्रस्ताव अपात्र४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत १० हजार ३४४ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार ९४४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ३ हजार ९२० प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरविले आहेत़ त्यामुळे या प्रस्तावांतील त्रूटी दूर करून अपात्र करण्यात आलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशीही मागणी लाभार्थ्यांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती