गंगाखेड नाक्यावर ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:46 IST2019-03-19T18:41:09+5:302019-03-19T18:46:41+5:30
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली़

गंगाखेड नाक्यावर ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक ठार
परभणी- शहरातील गंगाखेड नाक्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन एक युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १९ ) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, परभणी तालुक्यांतील आंबेटाकळी येथील दोन युवक एमएच २२/८४४० या दुचाकीने परभणी शहरातून गावाकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी गंगाखेड नाका येथे पोहचल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला असून, अन्य एक जण जखमी झाला आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ या प्रकरणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ त्यामुळे अपघातातील मयत व जखमींची नावे समजू शकली नाहीत़