वळण रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:24 IST2023-06-30T16:23:39+5:302023-06-30T16:24:55+5:30
यात एकजण गंभीर जखमी झाला आहे

वळण रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा जागीच मृत्यू
मानवत: शहरातील वळण रस्त्यावर कोक्कर कॉलनीजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजता घडली.
राजेश चंद्रकांत सोनवणे हा आत्याचा मुलगा संतोष शिवाजी जाधव ( रा हनुमान नगर, परळी) सोबत दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 22 ए यू 7663) शहरातील आंबेडकर नगरातून गुरुवारी रात्री आठ वाजता निघाले. वळण रस्त्याने शहरात येत असताना कोक्कर कॉलनीजवळ अपघात झाला. यात संतोष शिवाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश सोनवणे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनी प्रभाकर कापुरे, पोह नारायण सोळंके, राजू इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.