जिल्ह्यात रुग्ण घटले; मृत्यू मात्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:32+5:302021-05-07T04:18:32+5:30

परभणी : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या धास्ती वाढल्या आहेत. दुसरीकडे रुग्णांची संख्या मात्र ...

The number of patients in the district decreased; Death, however, increased | जिल्ह्यात रुग्ण घटले; मृत्यू मात्र वाढले

जिल्ह्यात रुग्ण घटले; मृत्यू मात्र वाढले

Next

परभणी : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या धास्ती वाढल्या आहेत. दुसरीकडे रुग्णांची संख्या मात्र घटल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील आठवड्यापासून कोरोना संसर्ग कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात १ हजारपेक्षा अधिक रुग्ण दररोज नोंद होत होते. ही संख्या आता ७०० ते ८०० रुग्णांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूने नागरिक धास्तावले आहेत. ६ मे रोजी दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात ७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे.

बाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. गुरुवारी २ हजार ४६६ नागरिकांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यामध्ये ६५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ९३७ अहवालांमध्ये ४५४ आणि रॅपिड टेस्टच्या ५२९ अहवालांमध्ये १९६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४१ हजार ४५२ झाली असून त्यापैकी ३२ हजार ६१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ९८३ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाला. सध्या ७ हजार ८५० रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३५, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २४६, अक्षदा मंगल कार्यालयात १६५, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ६ हजार ४७४ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

६३९ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील ६३९ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याने गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील आठवड्यापासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.

Web Title: The number of patients in the district decreased; Death, however, increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.