जिल्ह्यात रातराणी बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:52+5:302021-06-16T04:24:52+5:30

परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या चार आगारांमधून सद्यस्थितीत ८०० नियमित बसफेऱ्या होत आहेत. त्यातून जवळपास १९ ...

The night bus service in the district did not get any response from the passengers | जिल्ह्यात रातराणी बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना

जिल्ह्यात रातराणी बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना

Next

परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या चार आगारांमधून सद्यस्थितीत ८०० नियमित बसफेऱ्या होत आहेत. त्यातून जवळपास १९ लाख रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळत आहे. एकीकडे निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूकही पूर्ववत होत आहे. तर दुसरीकडे रातराणी व लांब पल्ल्यांच्या एसटी बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे मंगळवारी दिसून आले. परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार आगारांपैकी केवळ परभणी आगारातून रातराणी सेवेसाठी केवळ तीन बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. उर्वरित पाथरी, गंगाखेड व जिंतूर या तीन आगारांतून अद्याप रातराणी एसटी बसला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्हा अनलॉक झाल्यानंतरही या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. तर दुसरीकडे खासगी बसलाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मागील तीन महिन्यांपासून या ट्रॅव्हल्स बस एका जागेवर उभ्या असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.

केवळ पुणे मार्गावर गर्दी

कोरोना विषाणूच्या कडक निर्बंधांतून सूट मिळाल्यानंतर परभणी आगाराने रातराणी व लांब पल्ल्याचा प्रवासासाठी परभणी-पुणे ही बस सेवा सुरू केली आहे. या बससेवेच्या तीन फेऱ्या नियमित केल्या जातात. एकीकडे रातराणी बसला इतर आगारात प्रवासी मिळत नाहीत. तर दुसरीकडे पुणे- परभणी या मार्गावर या बससेवेला प्रवासी गर्दी करत असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: The night bus service in the district did not get any response from the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.