शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांनी पळविले येलदरीचे पाणी; मागणी नसताना ६० दलघमी पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:29 IST

गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देआत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

जिंतूर (जि. परभणी) : अनेक वर्षांनंतर शंभर टक्के भरलेले येलदरी धरण रिकामे करण्याचा डाव राजकीय दबावातून पाटबंधारे विभागाने आखला असून, गरज नसताना येलदरी धरणातील पाण्याचा सिद्धेश्वर धरणात विसर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यांत ६० दलघमी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे.

यावर्षी येलदरी व सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले. या धरणामुळे परभणी जिल्ह्यातील १६ हजार १४२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्टर व नांदेड जिल्ह्यातील १९ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार होता; परंतु शेतकऱ्यांची मागणी नसतानाही २२ नोव्हेंबरपासून सिद्धेश्वर धरणातून कालव्यामार्फत पाटबंधारे विभागाने राजकीय दबावातून पाणी सोडणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी रबी पिकांसाठीही मिळणार नाही. सोडलेल्या पाण्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचा सिंचनासाठी वापर करुन ९० टक्के पाणी वेगवेगळ्या चाऱ्यातून वाया जात आहे. या पाण्यावरील कोणत्याही चाऱ्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात मोठे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात पाणी भरुन ठेवले जात आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता ‘नंतर बोलतो’, असे म्हणून त्यांनी फोन बद केला. त्यानंतर सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

सिद्धेश्वर धरण रिकामे२५ नोव्हेंबर रोजी येलदरी व सिद्धेश्वर १०० टक्के भरले होते. याच कालावधीत नांदेडकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. २५ जानेवारी रोजी सिद्धेश्वर धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक राहिले होते.  या प्रकल्पातील ७५ टक्के पाणी नांदेडला सोडण्यात आले. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी २५ टक्के झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या नावाखाली दररोज ४ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे.

कारण नसताना घेतले पाणी२२ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी पहिल्याच पाणी पाळीत सोडून देण्यात आले. त्यानंतर  येलदरीमधून मागील पंधरा दिवसांपासून ६० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात सोडण्यात आले आहे. एप्रिल, मेपर्यंत येलदरी धरणातील पाणी घ्यायचे आणि मे महिन्यात जायकवाडीचे पाणी घ्याचे, असा डाव नांदेडच्या नेतृत्वाने आखल्याची शंका शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी जिंतूर येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या प्रश्नी १८ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांची भेट घेऊन नांदेडला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच २४ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेतली जाणार असून, त्यानंतर आंदोलन तीव्र केले जाईल.

शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलन समितीचे १ हजार कार्यकर्ते जलसमाधी घेतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. यासाठी शासनाने तातडीने येलदरी- सिद्धेश्वर धरणातून जाणारे पाणी बंद करावे.    - डॉ.दुर्गादास कानडकर,  निमंत्रक, पाणी बचाव आंदोलन समिती, जिंतूर 

टॅग्स :WaterपाणीparabhaniपरभणीNandedनांदेडDamधरण