mother's Suicide with a one-year-old child by jumping into a well | एक वर्षाच्या बालिकेसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
एक वर्षाच्या बालिकेसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देविहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे आढळले

जिंतूर (जि. परभणी) : तालुक्यातील मानकेश्वर येथील विहिरीत उडी घेऊन मातेने आपल्या एका वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघींची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. 

जिंतूर येथील गोविंद तोष्णीवाल यांचे मानकेश्वर शिवारात शेत आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील बटईदार काळूराम आडे हे विहिरीवर लावलेली मोटार सुरु करण्यासाठी गेले असता विहिरीत एक वर्षाच्या बाळाचा मृतदेह  तरंगत असल्याचे त्यांना दिसले. आडे यांनी ही माहिती गोविंद तोष्णीवाल यांना दिली. तोष्णीवाल यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

सहायक पोलीस निरीक्षक शेख अहमद, जमादार सय्यद साजीद यांनी घटनास्थळ येऊन बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर  काढला. त्यावेळी विहिरीच्या शेजारी एक चप्पल, साडी असलेली थैली आढळली. त्यामुळे विहिरीत शोध घेतला असता एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेहही आढळला. दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवले असून ओळख पटली नाही. या मातेसंदर्भात माहिती असल्यास जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले आहे.

Web Title: mother's Suicide with a one-year-old child by jumping into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.