शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बसफेऱ्यांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांच्या ठिकाणी थांबण्यासाठी ...

वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था

परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांच्या ठिकाणी थांबण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर थांबूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे सावली विश्रामगृह परिसरातील प्रवासी निवाऱ्याची तर दुरवस्था झाली आहे. एसटी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवारे प्रवाशांना सोयीचे ठरतील, या पद्धतीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

जि.प.च्या इमारतीचे काम संथगतीने

परभणी : शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम संथगतीने होत असून, अनेक कार्यालयांचे स्थलांतर रखडले आहे. जिल्हा परिषदेची अनेक विभाग वेगवेगळ्या भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होते. जि.प. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. तेव्हा जि.प. इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय

परभणी : शहरात जुन्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. नळांना पाणी आल्यानंतर गळतीद्वारे हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्याचा वाहतुकीलाही होतो. शिवाय गळतीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, गळती दुरुस्त करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

पणन महासंघाने बंद केले खरेदी केंद्र

परभणी : जिल्ह्यात कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने कापूस पणन महासंघाने कापसाची खरेदी बंद केली आहे. परभणीसह पाथरी, गंगाखेड आणि सोनपेठ या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. आता तीन खरेदी केंद्र बंद करण्यात आले असून, केवळ परभणी येथील केंद्रावरच कापसाची खरेदी केली जात आहे/.

मग्रारोहयोतील विहिरींची कामे संथगतीने

परभणी : ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक विहिरींचे बांधकाम केले जात आहे. मात्र अनेक तालुक्यात ही कामे ठप्प पडली आहेत. उन्हाळा तोंडावर आला असताना विहिरींची कामे पूर्ण झाली नसल्याने योजनेचा उद्देशालाच बगल मिळत आहे.