गंगाखेडच्या बालसुधार गृहातुन अल्पवयीन मुलीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:27 IST2018-04-27T17:27:36+5:302018-04-27T17:27:36+5:30
परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गंगाखेडच्या बालसुधार गृहातुन अल्पवयीन मुलीचे पलायन
गंगाखेड ( परभणी ) : परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
परभणी येथील नानलपेठ पोलीसांनी बुधवारी ( दि.२५ ) शहरातील कल्पना चावला मुलींचे बालकाश्रम ( बालगृह) बालसुधार गृह येथे पंचशीला रमेश थोरात (१६) या अल्पवयीन मुलीस दाखल केले. आज सकाळी अकरा वाजता ती स्नान करण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. यानंतर सोबतच्या मुलीला धक्का देत तिने सुधार गृहाच्या पाठीमागील संरक्षण भिंतीवरुन उडी मारून पलायन केले. हे पाहताच तेथे असलेल्या मुलींनी आरडाओरडा केला. यानंतर सुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बस स्थानक, रेल्वे स्टेशन व शहरातील बाजारपेठ आदी ठिकाणी पंचशीलाचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. बालकाश्रमाच्या ( बालगृह ) अध्यक्षा चित्रा दुधाटे यांच्या माहितीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे, पोलीस शिपाई गणेश वाघ हे करत आहेत.