शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील औषधी, इंजेक्शन जिल्ह्यात नाही उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

दुर्मिळ आजार : रुग्णांना उपचारासाठी परजिल्ह्यात व्हावे लागतेय स्थलांतरित लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील ...

दुर्मिळ आजार : रुग्णांना उपचारासाठी परजिल्ह्यात व्हावे लागतेय स्थलांतरित

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील लिपोसोमल एम्फोटोसिरीन बी हे इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनावर उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना उपचारादरम्यान किंवा बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे जिल्ह्यातही आढळली आहेत. काळ्या बुरशीचा हा आजार अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळत असत. आता तीन रुग्णांना या आजाराची लक्षणे आढळत असल्याने या आजारावरील लिपोसोमल एम्फोटोसिरीन बी या इंजेक्शनची मागणी होत आहे. ही मागणी मोठ्या प्रमाणात नसली तरी जिल्ह्यात या इंजेक्शनचा साठाच उपलब्ध नाही. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस आजारावर लागणाऱ्या औषधींची साठा कंपन्यांकडे नोंदविला आहे. मात्र, अद्याप तरी ही औषधी उपलब्ध झाली नाही.

सध्या या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर रुग्णास औरंगाबाद किंवा इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.

उपचारासाठी इतर जिल्ह्यांकडे धाव

म्युकरमायकोसिस या आजारावर वेगवेगळ्या अवयवांच्या तज्ज्ञांकडून उपचार करावे लागतात. रुग्णांना लक्षणे जाणवल्यानंतर एमआरआय केल्यानंतरच संसर्ग किती पसरला आहे यावर उपचार पद्धती अवलंबून आहे.

प्राथमिक उपचार जरी जिल्ह्यात होत असले तरी पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी इतर जिल्ह्यांत जाऊनच रुग्णांना उपचार करावे लागत आहेत.

जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे औषधींची मागणीही मर्यादित आहे. प्रशासन जिल्ह्यात ही औषधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अद्याप झाला नाही पुरवठा

मोजक्याच रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. त्यासाठीची औषधी महागडी आहे. यापूर्वी या औषधींचा वापर झाला नसल्याने सध्या प्रशासनाकडून मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, अद्याप या औषधींचा पुरवठा झालेला नाही.

ओठ, नाक, जबड्याला फटका

या आजारात सर्वप्रथम नाकाला इन्फेक्शन होते. त्यानंतर डोळ्यांच्या जवळ त्वचा काळी होते.

डोळा सुजणे, लाल होणे, डबल दिसणे अशी लक्षणे आहेत.

दात दुखणे, हिरड्या सुजणे, दातांजवळ काळा थर जमा होणे ही लक्षणेही सांगितली जात आहेत.

संसर्गाच्या प्रमाणानुसार ठरविले जातात डोस

म्युकरमायकोसिस आजार झाल्यानंतर त्यास लिफोसोमल एम्फोटोसिरीन बी हे इजेक्शन दिले जाते.

रुग्णाच्या संसर्गानुसार त्याला इंजेक्शनचे किती डोस लागतात, हे ठरविले जाते.

साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत हे डोस द्यावे लागतात.

मधुमेह चाचणी करा

एमआरआय केल्यानंतरच आजाराचा संसर्ग कळतो. कोविडनंतर मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी नियमित मधुमेह चाचणी करावी. शुगर लेव्हल मेंटेन ठेवावी. काही लक्षणे दिसू लागली तर तातडीने तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.

- डॉ. तेजस तांबोळी

डोळ्यांची लक्षणे...

हायफ्लो ऑक्सिजन, स्टेरॉइडचा वापर झालेल्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर

डोळ्याच्या खालची पापणी थोडी वाकडी होणे, डोळे लाल होणे, सुजणे, डोळे दुखणे, नजर कमी होणे, अशी लक्षणे आढळल्यास नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे.

- डॉ. हनुमंत भोसले

तज्ज्ञांच्या पथकामार्फत उपचार

म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे सुरुवातीला नाक आणि डोळ्यांना दिसतात. त्यानंतर दातांनाही लक्षणे जाणवू लागतात. त्यात दाद दुखणे, दातांमध्ये वेदना होणे, हिरड्या सुजणे, दातांजवळ काळा थर जमा होणे, अशी लक्षणे दिसतात. या आजारात तज्ज्ञांच्या पथकाच्या निगराणीखाली उपचार करावे लागतात.- डॉ. नितीन सोमाणी