मोठी दुर्घटना टळली; पाईपवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती, १४ रुग्णांना इतरत्र हलवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:32 IST2021-04-28T01:32:54+5:302021-04-28T06:32:04+5:30
परभणी शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले.

मोठी दुर्घटना टळली; पाईपवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती, १४ रुग्णांना इतरत्र हलवलं
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपवर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास झाड पडल्याने पाईपला गळती लागली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या १४ रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
परभणी शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या बाजूचे एक झाड कोविड रुग्णांना ऑक्सिजन देणाऱ्या पाइपवर पडले. त्यामुळे ऑक्सिजनची गळती सुरू झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधित वाॅर्डमधील १४ रुग्णांना दुसऱ्या वाॅर्डमध्ये हलविण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, उप विभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार आदींनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री १२ वाजता गळती रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते.